महाबळेश्वरमध्ये २ दिवसांपासून मुसळधार पाऊस ,वेण्णा लेक ओव्हर फ्लो, रस्ता गेला पाण्याखाली

सातारा : थंड हवेचे ठिकाण आणि महाराष्ट्रातील काश्मीर मानल्या जाणाऱ्या पाचगणी आणि महाबळेश्वर येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. यावेळी ते वेण्णा लेकला नक्की भेट देत असतात. पण मुसळधार पावसामुळे हा वेण्णा लेक ओव्हरफ्लो झाला असून याला लागून असलेला रस्ता पाण्याखाली गेला आहे.

वेण्णा लेक ओव्हर फ्लो झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाबळेश्वर भागात मुसळधार पाऊस कोसळतो आहे. हवामान खात्याने सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे.

गेल्या ४ दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचत आहे.

Leave a Reply