मिशन बिगीन अगेन २.० : राज्यात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन

महाराष्ट्रात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे.

मुंबई - राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यातच मिशन बिगीन अगेनचा पहिला टप्पा ३० जूनला संपणार होता. मात्र, आता राज्य सरकारने हे लॉकडाऊन ३० जुलैपर्यंत वाढविले आहे. हा मिशन बिगीन दुसरा टप्पा असणार आहे.राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवारी ५ हजार ४९३ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 1 लाख 64 हजार 626 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत 7 हजार 429 मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये एकूण 70 हजार 622 केसेस अॅक्टिव्ह आहेत. तर 86 हजार 575 जण उपचारानंतर बरे झाले आहेत.

Leave a Reply