मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर रुग्णवाहिकेचा स्फोट, रुग्णवाहिका जाळून खाक

पुणे:-मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर रुग्णवाहिकेचा स्फोट झाला आहे. रुग्णवाहिका जाळून खाक झाली आहे.पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या मार्गिकेवर नादुरुस्त झालेल्या रुग्णवाहिकेला आग लागून तिचा स्फोट झाला आहे.रुग्णवाहिकेचे स्फोटामुळे उडालेले पार्ट रोडच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.सुदैवाने रुग्णवाहिका जेव्हा नादुरुस्त झाली त्यावेळी त्यामधून सर्व प्रवासी बाहेर पडल्याने जीवितहानी झाली नाही.मात्र अत्यावस्थ असलेल्या महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. रुग्णवाहिका नादुरुस्त झाल्याचं लवकर लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. रुग्णवाहिकेच्या या स्फोटात पोलीस कर्मचाऱ्यांची दुचाकी आणि रुग्णवाहिका जळून खाक झाली आहे.नादुरुस्त असल्याने रुग्णवाहिका समोर न जाता उतारावरुन मागे येत होती. हे लक्षात आल्यावर प्रवासी रुग्णवाहिकेतून उतरले. त्यानंतर उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेचा स्फोट झाला आणि रुग्णवाहिका जळून खाक झाली.रुग्णवाहिकेच्या या स्फोटात पोलीस कर्मचाऱ्यांची दुचाकी आणि रुग्णवाहिका जळून खाक झाली आहे.रुग्णवाहिकेला लागलेली आग देवदूत व फायरब्रिगेडच्या मदतीने विझवण्यात आली आहे.रुग्णवाहिकेमधून ज्या अत्यवस्थ रुग्ण महिललेलं घेऊन जात होती. तिचा लाइफ सपोर्ट सिस्टम बंद पडल्याने ती मृत्युमुखी पडली

Leave a Reply