मैत्रिणी समोर अपमानास्पद वागणूक दिल्याच्या वादातून तरुणाची हत्या

पार्टीमध्ये मैत्रिणी समोर अपमानास्पद वागणूक दिल्याने उद्भवलेल्या किरकोळ वादातून एका तरुणाची त्याच्याच मित्राने चाकू भोकसून हत्या केल्याची खळबळजनक घटना नागपूर शहरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. तुषार सुरेशसिंग बैस (वय २३) असे मृत तरुणाचे नाव आहे.

नागपूर - पार्टीमध्ये मैत्रिणी समोर अपमानास्पद वागणूक दिल्याने उद्भवलेल्या किरकोळ वादातून एका तरुणाची त्याच्याच मित्राने चाकू भोकसून हत्या केल्याची खळबळजनक घटना नागपूर शहरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. तुषार सुरेशसिंग बैस (वय २३) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर, आकाश ताराचंद गौड, असे मुख्य आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या शिवाय अवस्थी नामक आरोपी पळून गेला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
मंगळवारी रात्री तुषार, आकाश आणि अवस्थी हे तिघेही एका मैत्रिणीच्या फ्लॅटवर पार्टी करण्यासाठी गेले होते. त्या दरम्यान गाणे वाजवण्याच्या विषयावरून तुषार आणि आकाशमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर तिघेही पार्टी सोडून घरी परत जाण्यासाठी निघाले असता त्यांच्यात पुन्हा वाद उफाळून आला. आकाशने तुषाराला बघून घेण्याची धमकी दिली होती. त्यावेळी तिघेही आपल्या घरी निघून गेले, मात्र रात्री उशिरा तुषार आणि अवस्थी आकाशच्या घरी गेले. घराजवळ पुन्हा वादावादी झाल्यामुळे संतापलेल्या आकाशने भाजी कापण्याच्या चाकूने तुषारच्या छातीवर वार केला. त्यावेळी अवस्थी देखील तिथेच होता, मात्र आकाशने तुषारवर हल्ला करताच तो घटनास्थळावरून पळून गेला.

आरोपी आकाशने तुषारला रुग्णालयात केले दाखल
तुषार रक्ताच्या थारोळ्यात लोळत असल्याचे बघून आरोपी आकाशने त्याला रुग्णालयात दाखल केले. रात्रभर तुषार जवळ तो थांबला होता. सकाळी डॉक्टरांनी तुषारला मृत घोषित केल्यानंतर आरोपी आकाश तिथून पळून गेला. डॉक्टरांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी काही तासातच आकाशला अटक केली. मात्र, अवस्थी नावाचा आरोपी अद्याप पोलिसांना सापडलेला नाही.

Leave a Reply