येवल्यात कांदा लिलाव अनिश्चित काळासाठी बंद, बाजार समितीचा निर्णय

शेतकऱ्यांनी पुढील आदेश येत नाही तोपर्यंत कांदा व भाजीपाला लिलावासाठी आणू नये अशा प्रकारचा फलक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात लावण्यात आला आहे.

नाशिक – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून येवला कृषी उत्पन्न बाजार समिती मधील कांदा लिलाव आज पासून (सोमवार) अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे. तसेच भुसारमाल, शेतमालाचे आणि भाजीपाल्याचे लिलावही आजपासून अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहेत.शेतकऱ्यांनी पुढील आदेश येत नाही तोपर्यंत कांदा व भाजीपाला लिलावासाठी आणू नये अशा प्रकारचा फलक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात लावण्यात आला आहे.

Leave a Reply