राऊतांचे स्पष्टीकरण:म्हणाले – सरकार नाही विधानसभा बरखास्त होईल असे म्हटले; भविष्यात काय होईल हे कोणी सांगू शकत नाही

सरकार बरखास्त असे मी म्हटले नसून, विधानसभा बरखास्त असे मी म्हटले आहे

मुंबई:-सरकार बरखास्त असे मी म्हटले नसून, विधानसभा बरखास्त असे मी म्हटले आहे, असे स्पष्टीकरण शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. काही वेळापूर्वी राऊतांनी एक ट्विट करत राज्याची वाटचाल बरखास्तीकडे असे म्हटले होते.

पुढे राऊत म्हणाले की, मी जे मत व्यक्त केले आहे. त्यात मला काही चुकीचे वाटत नाही. राज्यातील आमदारांवर दबाव टाकण्यात येत असून, आमदारांची पळवा-पळवी सुरू आहे. राज्याच्या बाहेर नेऊन त्यांच्यावर हल्ले करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील सरकार अस्वस्थ आहे. उद्या परवा किंवा भविष्यामध्ये सरकारला काय वळण येईल हे कोणी सांगू शकत नाही. राज्यांमध्ये जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते, तेव्हा विधानसभा बरखास्त करुन पुढील निवडणुकांना सामोरे जाण्याचे मार्ग स्वीकारला जातो, ते मत मी व्यक्त केले असल्याचे संजय राऊत म्हणाले.

महाविकास आघाडी एकसंघ

महाविकास आघाडी ही एकसंघ आहे. आमचे काही आमदार राज्याच्या बाहेर आहे. त्यातील एक आमदार नितीन देशमुख हे नागपुरात परतले आहेत. त्यांच्यासोबत जो प्रकार घडला ते अतिशय भयंकर आहे. जो पर्यंत सगळे मुंबईला येत नाही तोपर्यंत कोणतेही मत व्यक्त करणे योग्य नाही, एकनाथ शिंदेसोबत मी आज सकाळीच फोनवर झाले, असेही राऊत म्हणाले.

भाजपने अपहरण केले

भाजपच्या पाठिंब्याशिवाय आमदारांचे अपहरण शक्य नाही. मात्र, या प्रसंगातूनही आम्ही बाहेर पडू, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला आहे. सीतेल एकच अग्निपरीक्षा करावी लागली. शिवसेना अशा अग्निपरीक्षांना वारंवार सामोरे जात आहे. निष्ठेच्या अग्निपरीक्षेत स्वत:ला शिवसैनिक म्हणून घेणारे काहीजण पास होतात ते भविष्यात दिसेल, असा इशारा राऊतांनी बंडखोरांना दिला आहे.

अग्निपरीक्षेला सुरुवात

पुढे राऊत म्हणाले की, ज्यांनी-ज्यांनी बाळासाहेबांच्या स्मारकावर जाऊन निष्ठेच्या आणाबाका घेतल्या होत्या, कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र द्रोह्यांना मदत करणार नाही, शिवसेनेची साथ सोडणार नाही. अशा प्रकारच्या आणाबाका घेतल्यावर आमचे लक्ष आहे, त्यांची अग्निपरीक्षेची सुरुवात झाली असून, भविष्यात काय होईल हे लवकरच दिसेल.

शिवसेनेचे हे कारस्थान नाही

उद्धव ठाकरे हे अशा प्रकारचे कारस्थान करत नाहीत, जे असेल ते सरळ आणि समोर करतात. पाठिंमागून वार करण्याचे उद्योग शिवसेनेचे नाही. गुवाहटीचा काजीरंगा हे अभायरण्य हे फिरण्यासाठी एक उत्तम जागा आहे. सध्या तिथे चांगला पाउस देखील पडत आहे. त्यामुळे कोणाला निसर्ग दर्शनाला जायचे असेल तर ते जाऊ शकतात, असा टोलाही राऊतांनी लगावला.

Leave a Reply