
पुणे :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तर राज्य सरकार हे मराठा आरक्षण, धनगर आरक्षण आणि मुस्लीम आरक्षणासह कोयता गँग, ड्रग्ज माफीया अशा अनेक विषयात अतिशय असंवेदनशील असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की, “मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे की, तुमच्या गृहमंत्र्याचा तातडीनं राजीनामा घेतला पाहिजे, सातत्यानं जालन्याला ज्या अमानुष पद्धतीनं महिलांवर मुलांवर अन्याय आणि लाठीचार्ज केला जात आहे. याच गृहमंत्रालयानं त्यानंतर ज्या पद्धतीनं कोयता गॅंग असेल आणि ज्या पद्धतीनं मराठा असेल धनगर, लिंगायत, मुस्लिम समाजाचे आरक्षणाचे विषय असतील, अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे आणि हे सगळं पूर्ण अपयश हे सरकारचं आहेच, पण त्याच्यात गृहमंत्रालयाचं जास्त आहे, त्यामुळे या राज्याच्या गृहमंत्र्यांनी तातडीनं राजीनामा दिला पाहिजे.”
“कालपासून हेच बोलत आहेत की, काल सत्तेत असलेले जे आमदार आहेत. मंत्र्यांची कॅबिनेट झाली होती, सह्याद्रीला आणि आंदोलन सत्तेत असलेले आमदार करत होते, गव्हर्नर हाऊसला. गव्हर्नर हाऊस आणि सह्याद्रीमध्ये तुम्ही चालत जरी गेला तरी दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत नाही. तर सह्याद्रीवर जाऊन न्याय मागण्यापेक्षा सत्तेत असलेले आमदार गव्हर्नर हाऊसला सत्तेत जातात. याचाच अर्थ आम्ही तर विरोधातच आहोत, पण सत्तेत असलेल्याही आमदारांना या ट्रिपल इंजिन खोके सरकारवर विश्वास राहिलेला नाही.”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“मी गेले दोन दिवस मागणी करतेय, तुमचा सगळा रेकॉर्ड काढून बघा ऑल पार्टी मीटिंग बोलवा आणि तातडीनं अधिवेशन घ्या, ही सातत्यानं मी मागणी करते आणि माझा स्वतःचा रेकॉर्ड तुम्ही काढून बघा आणि सत्तेतल्या बाकी सगळ्या खासदारांचा रेकॉर्ड काढून बघा, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, लिंगायत आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणाबद्दल महाराष्ट्राच्या वतीनं सगळ्यात जास्त वेळा हा मुद्दा मांडलेली खासदार कोण आहे?”, असंही त्या म्हणाल्यात. तसेच, पुढे बोलताना ते म्हणाले की, “माननीय देवेंद्रजी आमच्या घराच्याबाहेर येऊन म्हणाले होते, पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ धनगर समाजाला. काय झालं दहा वर्ष झाली गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार आहे, ना मराठा समाजाला 30 दिवसात… आज जरांगे पाटलांचा मनाचा मोठेपणा आहे की, ते स्वतः म्हटले 30 दिवस नको, मी दहा दिवस वाढवून देतो, 40 दिवस दिलेत