राज्यात आज कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा ड्रायरन; ३० जिल्ह्यात मोहीम

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा ड्रायरन; प्रत्येक केंद्रावर होणार 25 लाभार्थ्यांचे लसीकरण

सीरमची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीचा समावेश आहे.

भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा तिसरा टप्पा यशस्वी झाला आहे. पण याआधीच भारत बायोटेकच्या लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये तीन, व प्रत्येक महापालिका क्षेत्रात एक अशी आरोग्य संस्थेत ड्राय रन घेण्यात येत आहे. यापूर्वी २ जानेवारी चार ड्राय रन मोहिम राबवण्यात आली होती.

महाराष्ट्रातील ३० जिल्हे व २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्रायरन

मुंबई – कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम घेतली जात आहे. कोरोना लसीकरणाच्या या ड्रायरनचा आज दुसरा टप्पा असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार महाराष्ट्रातील ३० जिल्हे व २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्रायरन मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये ३ आरोग्य संस्था व प्रत्येक महानगरपालिकेमध्ये १ आरोग्य संस्था याठिकाणी ड्रायरन घेण्यात येईल. दरम्यान भारतात सिरम आणि बायोटेक या कंपनाच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या वापरास परवानगी दिली आहे.
जळगाव – जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ड्राय रनसाठी सकाळी 9 वाजेची वेळ निश्चित होती. परंतु, अद्याप पूर्वतयारी सुरू आहे. वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी ड्रायरनसाठी नर्सिंग महाविद्यालयात दाखल होत आहेत. ड्राय रनला 10 वाजेपर्यंत सुरुवात होण्याची शक्यता.

जिल्हा शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात नर्सिंग महाविद्यालयाच्या इमारतीत ड्रायरनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, जळगावातील शिवाजीनगरातील महापालिका प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र धामणगाव (ता. जळगाव) आणि जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात ही ड्रायरन होणार आहे.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ड्राय रन घेतली जात आहे

Leave a Reply