राज्य सरकारला पदोन्नतीत आरक्षण द्यायचं नाही, त्यामुळे मागासवर्गीय जनता त्यांना जागा दाखवेल – धर्मपाल मेश्राम

राज्यातील महाविकास आघाडी सरकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमधील आरक्षण देऊ इच्छित नसल्याचं स्पष्ट झाले असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव धर्मपाल मेश्राम यांनी केला आहे.

नागपूर – राज्यातील महाविकास आघाडी सरकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमधील आरक्षण देऊ इच्छित नसल्याचं स्पष्ट झाले असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव धर्मपाल मेश्राम यांनी केला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या अन्यायकारक भूमिकेमुळे येणाऱ्या काळात मागासवर्गीय समाज त्यांना त्यांची जागा दाखवेल असा इशारा देखील त्यांना दिला.
फुले, शाहू आणि आंबेडकरांचे नाव घेऊन सत्तेवर आलेल्या महाराष्ट्र राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारने आधीच ठरवले आहे की, त्यांना एससी, एसटी, ओबीसी, विजेएनटी संवर्गातील अधिकाऱ्यांना पदोन्नतीतील आरक्षण द्यायचं नाही.
२२ मार्च २१ रोजी राज्यातील मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील एसी, एसटी, एसबीसी विजेएनटी अधिकार्‍यांची माहिती संकलित करून तो डेटा सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करायचा होता. याकाळात या संदर्भात काम पूर्ण न झाल्याने या समितीला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, परंतु याही कालावधीत या समितीने एकही बैठक घेतली नसल्याचा आरोप धर्मपाल मेश्राम यांनी केला आहे. आता ५ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण सुनावणीसाठी ठेवण्यात येणार आहे. एकीकडे पदोन्नतीमध्ये आरक्षण देणार, असं जाहीर करून सुद्धा आत्तापर्यत माहिती गोळा का करण्यात आली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Leave a Reply