राठोडांची वर्णी म्हणजे निर्लज्जपणाचा कळस असून जनता जागा दाखवून देईल राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

पुणे:-महाराष्ट्राचे राज्यपाल मंगळवारी 15 दिवसांच्या पुणे मुक्कामी येत असून त्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भग्तसिंह काेश्यारी यांच्या वादग्रस्त भूमिकामुळे पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. मंगळवारी पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर गाेपाळकृष्ण गाेखले चाैकात राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपालांच्या विराेधात ‘महाराष्ट्र छाेडाे राज्यपाल’ आंदाेलन करत निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच राठोडांची वर्णी म्हणजे निर्लज्जपणाचा कळस असून जनता जागा दाखवून देईल अशी जोरदार टीका मंत्रिमंडळ विस्तारावरही यावेळी करण्यात आली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आमदार विद्या चव्हाण म्हणाल्या, राज्यपालांनी मराठी माणसाचा अपमान सातत्याने केला आहे. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज नंतर सावित्रीबाई फुले व आता मराठा भाषिकांचा अपमान केला. राज्यपालांनी माफी मागितली असली तरी ती काफी नाही. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी राज्यपालांना पुन्हा बाेलावून घ्यावे. अन्यथा आम्ही राज्यभरात राज्यपाल यांना महाराष्ट्र व मुंबईत फिरु देणार नाही.
वादग्रस्त आमदार संजय राठाेड यांना भाजपचा विराेध नव्हता त्यांनी त्यांना सन्मानाने पुन्हा साेबत घेतल्याचे दिसून येते. चित्रा वाघ आता गप्प का बसल्या आहेत. अब्दुल सत्तार तीन ते चार पक्ष बदलून आलेले असून त्यांच्या मुलांना खोट्या पदव्या मिळाल्याने शिक्षणमंत्रीच केले पाहिजे असा उपराेधिक टाेला त्यांनी लगावला. मंत्रीमंडळातील शपथ घेतलेले मंत्री भ्रष्ट असून त्यांना राज्यातील जनता त्यांची जागा दाखवून देईल. निर्लज्जपणाचा कळस गाठत राठोड त्यांना पुन्हा समाविष्ट करुन घेण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे प्रवक्ते प्रदीप देशमुख म्हणाले, भाजपने संजय राठाेड यांच्या राजीनाम्याबाबत अकांडतांडव केले हाेते. आज त्यांना समाविष्ट करुन घेताना भाजप माफी मागणार आहे का? अब्दुल सत्तार यांच्या चार मुलांना टीईटी परीक्षेत अपात्र असताना पात्र करुन घेण्यात आले व स्वत:च्या शैक्षणिक संस्थेत नाेकरी देण्यात आली. अशा लाेकांना समाविष्ट करुन घेतल्याने भाजपने जनतेची माफी मागावी. आम्हाला तत्व नाही, सत्तेपुढे आम्ही लाचार आहोत, अनैतिक लाेकांना नैतिक करण्याचे वाॅशिंग मशीन भाजपकडे आहे का? असा टाेला त्यांनी यावेळी लगावला.

Leave a Reply