लगीन घटीका समीप आली! अंकिता-विकीच्या लग्न सोहळ्याला सुरुवात!

सुप्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) यांच्या लग्नाची अनेक दिवसांपासून टीव्ही जगतात चर्चा सुरू होती. आता या बातम्यांवर शिक्कामोर्तब झाले आहे. मनोरंजन विश्वात सध्या सुरू असलेल्या लग्नाच्या सीझनमध्ये हे जोडपे आता एकमेकांसोबत लग्नगाठ बांधण्यासाठी सज्ज झाले आहेत.

मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) यांच्या लग्नाची अनेक दिवसांपासून टीव्ही जगतात चर्चा सुरू होती. आता या बातम्यांवर शिक्कामोर्तब झाले आहे. मनोरंजन विश्वात सध्या सुरू असलेल्या लग्नाच्या सीझनमध्ये हे जोडपे आता एकमेकांसोबत लग्नगाठ बांधण्यासाठी सज्ज झाले आहेत. अंकिता लोखंडेने तिच्या इंस्टाग्रामवरून सकाळी एक सुंदर छायाचित्र शेअर करून लग्नसोहळा सुरू झाल्याची माहिती दिली. यानंतर तिच्या भावी पतीनेही काही फोटो शेअर केले आहेत.

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या लग्नाच्या चर्चेदरम्यान, त्यांच्या लग्नाआधीचे फोटोज समोर आले आहेत. या फोटोंमध्ये हे कपल खूपच सुंदर दिसत आहे. लग्नाच्या गोंधळादरम्यान, अंकिताने तिच्या इंस्टाग्रामवरून एक फोटो शेअर केला आणि माहिती दिली की, तिचा विवाहसोहळा सुरू झाला आहे. हे छायाचित्र पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांच्या या पोस्टवर चाहते सातत्याने कमेंट करत आहे आणि दोघांनाही शुभेच्छा देत आहे.

एक फोटो अंकिताने शेअर केला होता, तर दोन फोटो तिच्या भावी पती विकी जैनने शेअर केले होते. अंकिताने शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघेही हसताना दिसत आहेत. अंकिता आणि विकी या दोघांनी लग्नाच्या दिवसाप्रमाणे मुंडावळ्या बांधल्या आहेत. अंकिता आणि विकी अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. अनेकवेळा या दोघांचे एकत्र फोटो चर्चेत आले होते. आता अंकिता तिचा बॉयफ्रेंड विकी जैन सोबत सात फेरे घेणार आहे. हा फोटो शेअर होताच सर्व अटकळांना पूर्णविराम मिळाला आहे.

मराठमोळ्या पद्धतीने लग्न
फोटो पाहता हे लग्न मराठी रितीरिवाजानुसार होणार असल्याचे म्हणता येईल. ‘पवित्र रिश्ता’ या टीव्ही मालिकेमुळे अंकिता लोखंडे सर्वांची लाडकी झाली होती. त्यादरम्यान ती सुशांत सिंह राजपूतसोबत नात्यात होती. पण नंतर त्यांचे नाते तुटले. नाते तुटल्यानंतरही अंकिता सुशांत सिंह राजपूतची चांगली मैत्रीण म्हणून त्याच्या आयुष्यात राहिली. पण, सुशांत सिंहने फार कमी वेळात या जगाचा निरोप घेतला.

Leave a Reply