साडी नेसलेल्या महिलेस रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारल्याने भडकली रिचा चढ्ढा

साडी नेसलेल्या एका महिलेस रेस्टॉरंटमध्ये जाण्यास नकार दिल्यानंतर दिल्लीतील ‘अक्विला’ नावाचे रेस्टॉरंट सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. या प्रकरणी देशरातून लोक विरोध करीत असून महिलेस मिळालेल्या या वागणुकीचा संताप व्यक्त होत आहे. अभिनेत्री रिचा चढ्ढानेही सोशल मीडियावरुन आपला संताप व्यक्त केला.

नवी दिल्ली - साडी नेसलेल्या एका महिलेस रेस्टॉरंटमध्ये जाण्यास नकार दिल्यानंतर दिल्लीतील ‘अक्विला’ नावाचे रेस्टॉरंट सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका महिलेने रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांना विचारले की, तिला आत का जाऊ दिले जात नाही.

कर्मचारी म्हणाला की “मॅडम, आम्ही फक्त स्मार्ट कॅज्युअल्सला परवानगी देतो आणि साडी स्मार्ट कॅज्युअल्समध्ये येत नाही.”

अभिनेत्री रिचा चढ्ढा हिने देखील रेस्टॉरंट आणि या व्हिडिओवर आपला राग व्यक्त केला. तिने आपल्या सोशल मीडियावर लिहिले, “आपल्या पारंपारिक कपड्यांचा निषेध करणे, आपल्या स्वतःच्या भाषांचा अवमान करणे हे वसाहत वादानंतरच्या आघाताचा अवशेष आहे. हे फॅसिझमला प्रोत्साहन देणारे कृत्य आहे. जे या आघातचा फायदा घेत आहेत. साडी स्मार्ट आहे, तुमची पॉलिसी नाही #SariNotSorry #Aquila” असे तिने तिच्या ट्विटमध्ये लिहिले आहे.

ट्विटरवरील इतरांनीही रेस्टॉरंटच्या धोरणाशी असहमती दर्शवली आहे. एकाने म्हटले की खाण्यापिण्याच्या अशा ठिकाणांना स्वतंत्र भारतात सुद्धा अस्तित्वात राहण्याचा अधिकार नाही. मला खात्री आहे की अशा रेस्टॉरंट्स/क्लबचे परवाने रद्द करण्याची गरज आहे जे जातीय पोशाखाच्या विरोधात आहेत.

तर दुसऱ्याने लिहिलंय, “साडी नेसल्यामुळे प्रवेश नाकारणे पूर्णपणे मूर्खपणा आहे. रेस्टॉरंट-बार व्यवस्थापनाला या कारवाईसाठी कठोर शिक्षा दिली पाहिजे.”

अशा भरपूर प्रतिक्रिया यावर मिळत असून देशभरातून या रेस्टॉरंटच्या विरोधात लोक व्यक्त होत आहेत.

Leave a Reply