सुनेने वृद्ध सासू आणि नवऱ्याला मारहाण करून, घरातील मौल्यवान वस्तूंची तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार

संपत्तीच्या वादातून सुनेने वृद्ध सासू आणि नवऱ्याला मारहाण करून, घरातील मौल्यवान वस्तूंची तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार उत्तमनगर येथे घडला. या प्रकरणी ७८ वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून, त्यावरून सुनेसह तिच्यासोबतच्या एका व्यक्तीवर उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या उत्तमनगर येथे अहिरे गेटजवळ राहतात. त्यांना एक मुलगा, सून आणि नातू असा त्यांचा परिवार आहे. फिर्यादीचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांची सून आणि नातू यांच्यावर आहे. मात्र, सुनेने संपत्तीच्या विषयावरून फिर्यादीसोबत भांडण केले. सुनेने तिच्या नवऱ्याला आणि मुलाला घराबाहेर हाकलून देऊन फिर्यादीला मारण्याची धमकी दिली. हातोडीने त्यांच्या घरातील मौल्यवान सामानाची तोडफोड केली. त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या मुलालाही सुनेने आणि तिच्यासोबत आलेल्या व्यक्तीने मारहाण केली, असा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी उत्तमनगर पोलिस तपास करीत आहेत. .

Leave a Reply