सुशांतसिंह राजपूतचे गाणे व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेऊन जळगावातील तरुणाची आत्महत्या

तुषार ज्ञानेश्वर बारी (वय 21, रा. शिरसोली) असे मृत तरुणाचे नाव आहे. तुषार याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो आई-वडिलांना शेतीकामात मदत करत होता. आज दुपारी त्याचे आई-वडील शेतात कामाला गेले होते. आजी व लहान बहीण घरी असताना तुषार याने घराच्या मागच्या खोलीत ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

जळगाव- हिंदी चित्रपट अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने काही दिवसांपूर्वी मुंबईत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेची अद्यापही सर्वत्र जोरदार चर्चा आहे. आज जळगाव तालुक्यातील शिरसोली गावातही अशीच काहीशी घटना घडली आहे. शिरसोली येथील एका तरुणाने सुशांतसिंहच्या चित्रपटातील गाणे व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेऊन राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी 3.30 वाजता घडली असून यामुळे शिरसोली गावात खळबळ उडाली आहे.
तुषार ज्ञानेश्वर बारी (वय 21, रा. शिरसोली) असे मृत तरुणाचे नाव आहे. तुषार याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो आई-वडिलांना शेतीकामात मदत करत होता. आज दुपारी त्याचे आई-वडील शेतात कामाला गेले होते. आजी व लहान बहीण घरी असताना तुषार याने घराच्या मागच्या खोलीत ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार त्याच्या आजीच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी इतरांच्या मदतीने ओढणी कापून तुषारला खाली उतरवले. त्याला लागलीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून तुषारला मृत घोषित केले.
‘आय हेट लाईफ’ असा संदेशही ठेवला व्हॉट्सअॅप स्टेटसवर-तुषार याने गळफास घेण्यापूर्वी अभिनेता सुशांतसिंहच्या चित्रपटातील गाणे आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवले होते. ‘आय हेट लाईफ’ अशा संदेशही त्याने स्टेटसवर ठेवला होता. आत्महत्या केल्यानंतर त्याच्या अनेक मित्रांनी तुषारचे स्टेटस चेक केले असता हा प्रकार उघडकीस आला. त्याने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली? कशामुळे तो नाराज होता? या बाबत कोणालाही माहिती नव्हती. तो नाराज असल्याचे स्टेटसवरून समोर आले आहे.या घटनेनंतर तुषारचे कुटुंबीय, नातेवाईकांना प्रचंड धक्का बसला आहे. कुटुंबियांनी प्रचंड आक्रोश केला. तुषार याच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ, लहान बहीण व आजी असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपस करीत आहेत.

Leave a Reply