स्वातंत्र्यदिनाच्या आधी दिल्लीत मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता, गुप्तचर यंत्रणांकडून दिल्ली पोलिसांना अलर्ट

स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर भारतीय सुरक्षा यंत्रणांनी दिल्ली पोलिसांना अलर्ट जारी केला आहे. एजन्सींना मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी ड्रोनच्या माध्यमातून दिल्लीत हल्ला करण्य़ाचा कट दहशतवादी करत आहेत. आता एजन्सींनी याबाबत दिल्ली पोलिसांना सतर्क केले आहे.

नवी दिल्ली - स्वतंत्र्यदिनाच्या काही दिवस आधी दिल्ली पोलिसांना गुप्तचर यंत्रणांकडून अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये म्हटले आहे, की दहशतवादी स्वातंत्र्यदिनी एखादा मोठा हल्ला करू शकतात. विशेष करून हवाई हल्ला होण्याची जास्त शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस कमिश्नर बालाजी श्रीवास्तव यांनी ड्रोनसह अन्य उडणाऱ्या वस्तूंवर रोक लावली आहे. या अलर्टनंतर दिल्ली पोलीसच्या सर्व जिल्हा डीसीपींना गस्त वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सुरक्षा एजन्सीने इशारा दिला आहे की 15 ऑगस्टपूर्वी दहशतवादी ड्रोनच्या माध्यमातून दिल्लीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करू शकतातय विशेषत: 5 ऑगस्टला. कारण, याच दिवशी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 काढले होते.

एकीकडे एजन्सींने इशारा दिला असताना, दुसरीकडे दिल्ली पोलिसांनीही ड्रोन हल्ल्याचा सामना करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. दिल्ली पोलिस आणि इतर राज्यांतील पोलिसांना ड्रोन हल्ल्यांचा सामना करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. यात दोन स्तरांचे प्रशिक्षण आहे.

Leave a Reply