हिमाचलमध्ये भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्ग बंद

किन्नौर :- मान्सूनने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. भारतीय हवामान खात्याने येत्या तीन दिवसांत मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
दुसरीकडे, IMD ने येत्या दोन दिवसांत दिल्लीत पावसाची शक्यता वर्तवली आहे, जिथे G20 शिखर परिषद 9-10 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी हवामान खात्याने प्रगती मैदानाजवळ अतिरिक्त स्वयंचलित हवामान केंद्र उभारले आहे. हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातील निगुलसारीजवळ भूस्खलन झाले. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग 5 बंद करण्यात आला होता.

Leave a Reply