नितेश राणे यांचे हे वक्तव्य बालिशपणाचं आणि बुद्धी नसलेलं;- संजय काकडे

पुणे : – पुण्यात पुण्येश्वर मंदिराचा मुद्दा चांगलाच पेटला आहे.अनेक हिंदू संघटना तिथे होणाऱ्या दर्ग्यातील अनधिकृत बांधकाम ला विरोध करताना दिसत आहेत . भाजपच्या वतीने मोर्चा काढत पुण्यातील कसबा पेठेतील पुण्येश्वर मंदिराच्या परिसरातील दर्ग्यातील बांधकाम पाडण्याची मागणी भाजप आमदार महेश लांडगे आणि आमदार नितेश राणे यांनी भाषणात केली होती.नितेश राणे यांनी दिलेल्या इशाऱ्यावर शहरात प्रतिक्रिया उमटत आहेत . भाजपचेच उपाध्यक्ष संजय काकडे यांनी प्रतिक्रिया देत नितेश राणे यांना चांगलंच झापलं आहे.
“आत घुसलो तर अधिकार्यांना कुठे पळायचं कळणार नाही. पुन्हा महापालिका आयुक्तांना ‘लव्हलेटर’ पाठवणार नाही. फक्त तारीख जाहीर करू, मग इतिहास घडविण्यासाठी तयार राहा, असा इशारा भाजप आमदार नितेश राणे यांनी दिला होता. तर आपला ‘बॉस’ सागर बंगल्यावर बसलाय, आपण काहीही केलं तरी सहीसलामत बाहेर पडू, असे भडकाऊ भाषण आमदार नितेश राणे यांनी केले होते .
नितेश राणे यांची बुद्धी काढत संजय काकडे यांनी यांना खडे बोल सुनावले आहेत. नितेश राणे यांचे वक्तव्य बालिशपणाचे आणि बुद्धी नसलेले असल्याचं काकडे म्हणाले .नितेश राणे जर कापाकापीची भाषा करत असतील तर मी त्याचा निषेध करतो. जे काही अनधिकृत बांधकाम असेल त्यावर अधिकाऱ्यांच्या मार्फत कारवाई करण्यात येईल. आम्ही अधिकाऱ्यांना विनंती करू. ते कायद्यात असेल ते काम करतील. कोणी काही म्हणत असो मात्र देवेंद्र फडणवीस हे चुकीच्या कार्याला थारा देणार नाहीत. नितेश राणे जर म्हणत असतील आम्ही कापाकापी केले तर देवेंद्र फडणवीस मला मदत करतील तर असं काहीही नाहीये. नितेश राणे यांचे हे वक्तव्य बालिशपणाचं आणि बुद्धी नसलेलं आहे, अशा शब्दात संजय काकडे यांनी नितेश यांच्या भाषणाचा समाचार घेतला आहे.

Leave a Reply