2 लाखांच्या लाच प्रकरणी पुणे शहर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेतील कर्मचार्‍यासह खासगी व्यक्तीलाअटक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

पुणे :-मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी २ लाख रुपयांची लाच मागून त्यापैकी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुणे शहर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पोलीस कर्मचार्यासह खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. पोलीस शिपाई दीपक प्रल्हाद क्षीरसागर (वय ३४) गुन्हे शाखा युनिट ३ आणि सिमोन अविनाश साळवी (वय २७) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई खडकी परिसरात मंगळवारी रात्री उशिरा केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या भावाला मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात पकडण्यात आले होते.त्यात आरोपी न करणे व अटक न करणे यासाठी पोलीस शिपाई दीपक क्षीरसागर याने २ लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.त्यांच्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर त्याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.क्षीरसागर याने २ लाख रुपयांपैकी ३० हजार रुपये साळवी याच्याकडे देण्यास सांगितले.त्यानंतर खडकी परिसरात मंगळवारी रात्री उशिरा सापळा रचला असता.तक्रारदाराकडून सिमोन साळवी याने ३० हजार रुपये स्वीकारताना पकडण्यात आले.त्यानंतर क्षीरसागर काही ताब्यात घेण्यात आले.

Leave a Reply