3 ठिकाणी 18 लाखांचा गुटखा जप्त; लाेहियांवर कारवाई

नाशिक:-नाशिकरोडच्या सुभाषरोडवरील लोहिया दुकानावर छापा मारत तीन लाख ६१ हजारांचा गुटखा, सिगारेट जप्त करण्यात आले. नाशिकरोड पोलिस ठाण्यात संशयित सोनू लोहिया, रामविलास लोहिया, मनोज लोहिया यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न व सुरक्षा अधिकारी गोपाल कासार यांनी लोहिया कंपाउंड, शिंदे गावातील दोन गोदामावर छापा मारला. गोदामात तब्बल १४ लाख ७५ हजारांचा अवैध गुटखा जप्त केला. संशयित गोदाम मालक रामविलास लोहिया याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. सहायक आयुक्त विवेक पाटील, प्रमोद पाटील, गोपाल कासार, संदीप देवरे, अमित रासकर, योगेश देशमुख, निवृत्ती साबळे यांच्या पथकाने सहआयुक्त गणेश परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

Leave a Reply