Pune Kidnapping Case Balewadi| चिमुरड्या डुग्गू कसा सापडला ; पोलिसांनी शोधले की? अपहरणकर्ता सोडून पळाला? वाचा अपहरणाचा संपूर्ण घटनाक्रम

कामगाराजवळ ठेवलेला मुलगाही रडू लागल्याने कामगाराने त्याची पिशवी पहिली. त्यात मोबाईल क्रमांक मिळाला. त्याने संपर्क साधला. त्या कामगाराने त्या नंबरवर फोन केला. तो फोन बालकांच्या आई -वडिलांचा होता. पालकांनी या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना दिली. पुढे मुलगा तोच आहे काहे पाहण्यासाठी व्हिडीओ कॉल केला. त्याची खात्री करून घेतली

पुणे- शहरातील उच्चभ्रु परिसर असलेल्या बाणेर परिसरातून आठवडाभरापूर्वी(दि. 11 जानेवारी)ला डुग्गू उर्फ स्वर्णम चव्हाण या मुलाचे अपहरण झाले होते. चार वर्षाच्या बालकाच्या अपहरणाने शहरात सर्वत्र खळबळ निर्माण झाली होती. ठिकठिकाणी या चिमुरड्याची माहिती असलेले फलकही लावण्यात आलं होते. त सोशल मीडियावर त्याच्या फोटोसह त्याचे अपहरण झालेल्या वाहनाचा फोटोही प्रसिद्ध करण्यात आला होते. सर्वत्र केवळ याचा बालकाच्या अपहरणाची चर्चा होती.

सीसीटीव्हीही फुटेज मिळाले पण .. बालकाच्या अपहरणानंतर चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. पोलिसांना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळाले. मात्र या फुटेजमध्ये केवळ अपहरणकर्ता दुचाकीवरून घेऊन जाताना पाठमोरा दिसत होता. पोलिसांनी शोधा शोध करण्यास सुरुवात केली मात्रथांगपता लागत नव्हता. तब्बल आठ दिवसांपासून निम्मे पोलीस दल त्याचा शोध घेत असताना अपहरणकर्त्याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती पोलीसांना मिळत नव्हता. पोलीस दलात प्रेशर वाढले होते. सोशल मिडीयावरही त्याची चर्चा सुरु झाली होती.

असा सापडला डुग्गु शहरातील आठवडाभर होता असलेली चर्चा , सोशल मीडियावरून अपहरणाची पसरलेली महिती यातून अपहरण कर्त्याने स्वतःच मुलाला सोडून पलायन केल्याचे समोर आले आहे. आज बालेवाडी येथील पुनावळे परिसरातील एका कंपनीजवळ घेऊन आला. तिथे त्याने बसलेल्या कामगारजवळ बालकाला सोडले. ‘ अन मी दहाच मिनिटात आलो म्हणून तो अपहरणकर्ता सांगून गेला. मात्र बराच वेळा झाला तरी तो आला नाही. कामगाराजवळ ठेवलेला मुलगाही रडू लागल्याने कामगाराने त्याची पिशवी पहिली. त्यात मोबाईल क्रमांक मिळाला. त्याने संपर्क साधला. त्या कामगाराने त्या नंबरवर फोन केला. तो फोन बालकांच्या आई -वडिलांचा होता. पालकांनी या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना दिली. पुढे मुलगा तोच आहे काहे पाहण्यासाठी व्हिडीओ कॉल केला. त्याची खात्री करून घेतली. खात्री होताच पोलिसांनी पालकाच्या मदतीन घटना स्थळावर धाव घेतली. घटनास्थळावर मुलगा आढळल्याने मुलाच्या आईवडिलांच्या जीवात-जीव आला. पोलिसांनीही सुटकेचाश्वास सोडला.

महापौरांनी मानले पोलिसांचे आभार बालेवाडी परिसरातील अपहरण झालेला ४ वर्षीय स्वर्णव चव्हाण आज सापडला. पालकांच्या कुशीत असलेला स्वर्णवला पाहण्यासारखं दुसरं सुख ते काय? यांच्यासह स्वर्णवला शोधण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद ! या या शब्दात महापौर मुरलीधर मोहळ यांनी पुणे पोलिसांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply