इयत्ता दहावी परीक्षेतील विद्यार्थ्यांना इतर विषयांच्या गुणांची सरासरी काढून भूगोल विषयाचे गुण देणार

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेतील भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता,
मात्र विद्यार्थ्यांना आता भूगोल विषयाचे गूण मिळणार आहे, उर्वरित इतर विषयांच्या गुणांची सरासरी काढून भूगोल विषयाचे गुण देणार असल्याचे माहिती बोर्डाने दिलीय, तसेच दिव्यांगासाठी असणाऱ्या कार्यशिक्षण विषयाचे गुण ही सरासरी पद्धतीने दिले जाणार आहे, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता 10 वी चा भूगोल आणि पेपर रद्द करण्याचा निर्णय बोर्डाने घेतला होता, रद्द केलेल्या पेपर चे गूण विद्यार्थ्यांना कसे द्यायचे या बाबत मंडळाच्या सक्षम समितीने शासन मान्यतेने निर्णय घेतलाय, त्यानुसार सरासरी पद्धतीने विद्यार्थ्यांना गूण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिलीय,

Leave a Reply