कोथरूडच्या महात्मा सोसायटीत शिरला रानटी गवा

पुणे – आज भल्या पहाटे एक रानटी गवा अवतरल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोथरुड परिसरातील महात्मा सोसायटीत या गव्याचे दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोथरूडसारख्या दाट लोकवस्तीत हा प्राणी दिसून आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना दिसला गवा

महात्मा सोसायटीतील गल्ली क्रमांक एकमध्ये आज पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना हा गवा दिसला. सुरुवातीला गाय किंवा म्हैस असावी असे समजून स्थानिक नागरिकांनी दुर्लक्ष केले. परंतु काही वेळानंतर तो गवा असल्याचे लक्षात आल्यानंतर एकच धांदल उडाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने याची माहिती वन विभागाला कळवली. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

Leave a Reply