पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचं आंदोलन

जीवनावश्यक वस्तुंसोबतच पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसकडून आज आंदोलन देशासह राज्यभरात आंदोलनं सुरु आहेत. ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलनं केली.
पुण्यातही काँग्रेसच्या पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधातील आंदोलनाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आंदोलनाला सुरुवात झाली. राजधानी दिल्लीसह अहमदाबाद, पटणा, बंगळुरू आदी प्रमुख शहारांमध्ये काँग्रेस नेत्यांच्या नेतृत्वात आंदोलनास सुरूवात झाली आहे.
काँग्रेसच्या पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधातल्या आंदोलनाला पुण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. पुण्यातील काँग्रेसच्या पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधातल्या आंदोलनला पोलिसांची परवानगी दिलेली नव्हती. अर्ज देऊनही पोलिसांनी त्यावर कोणताच निर्णय घेतलेला नाही.

Leave a Reply