भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई बारामती मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक

भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई बारामती मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. ‘भारतीय जनता पार्टीने तिकीट दिल्यास १०० टक्के ही निवडणूक लढेन’ असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे २०२४ ला कदाचित सुळे विरूद्ध देसाई सामना रंगण्याची शक्यता आहे.
तृत्पी देसाई यांनी पत्रकार परिषद घेत आपली बारामतीत निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली इच्छा बोलून दाखवली त्या म्हणाल्या की, ” आजच आम आदमी पार्टीचे नेते त्यांच्या काही
आजच आम आदमी पार्टीचे नेते त्यांच्या काही वरिष्ठ नेत्यांचा निरोप घेऊन मला भेटायला आले होते. आमच्या पक्षात प्रवेश करा, आम्ही तुम्हाला बातमीतून लोकसभेची उमेदवारी देऊ, असं त्यांनी मला सांगितलं आहे. अनेक पक्षांचे मला फोन येत आहेत. परंतु मी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा विचार घेऊनच पुढचा निर्णय घेणार आहे. त्याशिवाय कुठल्याही एखाद्या राजकीय पक्षाने मला उमेदवारी दिली तर मी १०० टक्के बारामती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढेन. भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षाने मला विचारलं तर मी निवडणूक लढेनच. असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच बारामतीत आगामी काळात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आणि घराणेशाही विरुद्ध लोकशाही अशीच निवडणूक होऊ शकते. असा मनोद्य बोलून दाखवला. बारामती मतदारसंघावर पवारांची मजबूत पकड आहे. १९९१ पासून या ठिकाणी शरद पवार खासदार म्हणून निवडून येत
. बारामती मतदारसंघावर पवारांची मजबूत पकड आहे. १९९१ पासून या ठिकाणी शरद पवार खासदार म्हणून निवडून येत होते, तर मागील १४ वर्षापासून सुप्रिया सुळे बारामतीचे नेतृत्व करत आहेत. पण तृप्ती देसाई यांच्या घोषणेने बारामती निवडणूकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे.

Leave a Reply