महापालिकेच्या ताब्यातील अँमेनिटी स्पेस भाडेतत्त्वावर देण्याबाबत अखेर सत्ताधारीभाजपने घेतली माघार

पुणे शहरातील महापालिकेच्या ताब्यातील अँमेनिटी स्पेस भाडेतत्त्वावर देण्याबाबत अखेर सत्ताधारी
भाजपने माघार घेतली. या निर्णयास विरोधी पक्षांसह सामाजिक संघटनांनी तीव्र विरोध केल्यानंतर बुधवारी
मुख्य सभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी न आणण्याचा निर्णय आता भाजपने घेतला आहे. याबाबत घाईघाईने
कोणताही निर्णय न घेता पुणेकरांस, सामाजिक संस्था, नागरिक सर्वांना एकत्र विश्वासात घेऊन आम्ही
अँमेनिटी स्पेस भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

महापौर मुरलीधर मोहोळ आणि स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी याबाबत पत्रकार परिषदेत
भाजपची भूमिका स्पष्ट केली. यावेळी महापौर म्हणाले, या सर्व अँमेनिटी स्पेस भाडेतत्त्वावर देऊन त्या
माध्यमातून जवळपास १ हजार ७०० कोटींचे उत्पन्न महापालिकेला मिळणार आहे. या निधीतून अनेक
महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागू हाकणार आहेत. मात्र, राष्ट्रवादीसह सर्वच विरोधी पक्षांनी जाणीवपूर्वक अँमेनिटी
स्पेस विकायला काढल्या आहेत, असे आरोप करून पुणेकरांमध्ये गैरसमज निर्माण केला. एकीकडे
एमएमआरडीए, पीएमआरडीए, सिडको याठिकाणी असलेल्या राष्ट्रवादी व शिवसेनेच्या ताब्यामधील
संस्थांमध्ये अशा पद्धतीचा निर्णय घेतला आहे. पुण्यात मात्र भाजपची सत्ता असल्याने चुकीचे आरोप करून
गैरसमज पसरविला जात आहे. त्यामुळे घाईघाईने कोणताही निर्णय न घेता पुणेकरांसह सामाजिक संस्था,
नागरिक सर्वांना एकत्र विश्वासात घेऊन आम्ही अमेनिटी स्पेस भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेणार आहोत.
बुधवारी मुख्य सभेत यासंबंधीचा प्रस्ताव मंजूर करणार नसल्याचे महापौरांनी जाहीर केले. तसेच अमेनिटी
भाडेतत्त्वावर देण्यावर आम्ही ठाम असल्याचेही महापौर यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave a Reply