लॉककडाऊन काळातील जप्त वाहनांचा दंड माफ करून त्या त्वरित सोडून देणे

लॉककडाऊन काळातील जप्त वाहनांचा दंड माफ करून त्या त्वरित सोडून देणे बाबत*…

या निवेदनाद्वारे *आर पी आई आठवले वकील आघाडी* तर्फे आम्ही आपणाकडे मागणी करीत आहोत की संपुर्ण जगावर कोरोनाचे महाभयंकर संकट आलेले आहे या काळात संपुर्ण महाराष्ट्रात लॉक डाउन जाहीर केलेला होता याच काळात संपूर्ण महाराष्ट्रात अनेक नागरिकांची वाहने नियमभंग केल्याने पोलिसांनी जप्त केलेली आहेत कायद्याच्या दृष्टीने हे योग्यच होते, परंतु या लॉक डाऊन च्या काळात सर्वांचेच उत्पन्नाचे मार्ग बंद झालेले आहेत लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न उपस्थित झालेला असून ते जगण्यासाठी झगडत आहेत तरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वकील आघाडीच्या वतीने आम्ही मागणी करीत आहोत की सदर जप्त केलेली वाहने ही कोणताही दंड न आकारता त्या वाहन मालकाला योग्य ती समज देऊन सोडून द्यावीत. कारण आधीच नागरिकांना उत्पन्न नाही त्यात हा दंड आणि दंडासाठी रक्कम नसल्याने कामावर जाणे मुश्किल, अशी अनेकांची परिस्थिती आहे त्यामुळे आमच्या मागणीचा सहानभूती पूर्वक विचार होऊन जप्त वाहनांनचा दंड माफ करून ती सोडण्याचा आदेश आपणा कडून लवकरात लवकर काढण्यात यावा आणि नागरिकांना त्वरित दिलासा द्यावा ही विनंती …
*अॅड मंदारभाऊ जोशी*
राष्ट्रीय निमंत्रक
आर पी आई वकील आघाडी
*अॅड चित्राताई जानुगडे*
अध्यक्ष पुणे
आर पी आई वकील आघाडी
*अॅड आनंद कांबळे*
कार्याध्यक्ष पुणे
आर पी आई वकील आघाडी

Leave a Reply