सावरकर गौरव यात्रा नसून महाराष्ट्रात शिवद्रोही गौरव यात्रा – संतोष शिंदे, संभाजी ब्रिगेड

छत्रपती शिवाजी महाराजांची ज्या भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांनी बदनामी केली. त्रिवेदी व इतर वाचाळवीर, शिवद्रोही भाजप नेत्यांच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये तमाम शिवप्रेमींच्या वतीने निषेध आंदोलन, मोर्चे, बंद पुकारण्यात आला. त्याच वाचाळवीर सुधांशू त्रिवेदी ला घेऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सावरकरांची गौरव यात्रा काढतात आणि त्या यात्रेत शिवद्रोही वाचाळवीर सुधांशू त्रिवेदीचा गौरव करतात, त्याला शेजारी घेऊन बसतात याचा अर्थ सावरकर गौरव यात्रा नसून ही शिवधरोही गौरव यात्रा आहे. कारण सुधांशू त्रिवेदी सह सावरकरांनी ही छत्रपतींचा छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा अवमान केलेला आहे, आणि त्यांची ही गौरव यात्रा आहे. भाजपचा दुतप्पीपणा महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींनी लक्षात घ्यावा.

आरएसएसचा, भाजपचा डाव लक्षात घ्यावा यांना पूर्णवेळ शिवद्रोही विचारधारा पेरायचे आहे हे सुधांशू त्रिवेदीच्या उपस्थित राहण्यावरून दिसते. महाराष्ट्र हा खिल्लारपणा सहन करणार नाही. भाजपचा जाहीर निषेध…

Leave a Reply