Weather Forecast : पुढील पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

पुढील पाच दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबई - काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका हा सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्ह्यांना बसला होता. मात्र, अजूनही राज्यावर पावसाचा धोका टळलेला नाही. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. पुढील 24 तासात याची तीव्रता आणखी वाढणार आहे. पुढील पाच दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणाच्या किनारपट्टी भागात वाऱ्यांचा वेग ताशी 40-50 किमी प्रती तास राहण्याची शक्यता आहे.

कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मुसळधार -
कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आली आहे. सोबतच 30 जुलै आणि 31 जुलै रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आला आहे. मुंबई आणि उपनगरात पुढील तीन दिवस हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ऑरेंज अलर्ट -
मध्य महाराष्ट्रामधील घाट माथ्यावर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरीत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 30 जुलै आणि 31 जुलै रोजी या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अतिमुसळधार पावसाची शक्यता -
मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, साताऱ्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. 30 आणि 31 जुलै रोजी घाट माथ्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Leave a Reply